सावंतवाडी / प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथीक औषध अर्सेनीक अल्बम ३० वितरण करण्याचे परिपत्रक महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागामार्फत सर्व जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांना जारी करण्यात आलेले आहे.
याचाच भाग म्हणून रविवारी संपूर्ण गाव कोरोना मुक्त करण्याच्या निर्धाराने वेर्ले गावातील प्रत्येक घरातील सदस्यांना डॉ. संजीव लिंगवत यांच्या निदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथीक औषध अर्सेनीक अल्बम३० व कोरोना बाबतीत घ्यावयाचे काळजी बाबतीत पत्रक वाटप करून रुग्ण तपासणी करण्यात आली. तिसऱ्या कोरोना लाटेला हद्दपार करण्यासाठी आतापासूनच सर्वांनी सतर्कता बाळगली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सरपंच सुरेश राऊळ, उपसरपंच सुभाष राऊळ,पोलीस पाटील अरुण लिंगवत, डॉ. सई लिंगवत, आरोग्य सेवक सुहास गावडे, स्वयंसेवक गिर्यारोहक संदेश गोसावी, स्वराज्य मित्रमंडळ अध्यक्ष बाळु गावडे होते.