वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रोजेक्ट-75 अंतर्गत मंगळवारी भारतीय नौदलाला चौथी स्कॉर्पियन पाणबुडी सोपविण्यात आली आहे. प्रोजेक्ट-75 अंतर्गत एकूण 6 स्कॉर्पियन पाणबुडय़ा निर्माण केल्या जाणार आहेत. या पाणबुडय़ांची निर्मिती फ्रान्सच्या नेव्हल ग्रूपच सहकार्याने मुंबईमधील माझगाव डॉकयार्डमध्ये केली जात आहे. ‘वेला’ नावाच्या या पाणबुडय़ाची निर्मिती 6 मे 2019 रोजी सुरू झाली होती. कोरोना काळातील बंधनांनंतरही पाणबुडीच्या निर्मितीचे कार्य वेगाने सुरू राहिले. या पाणबुडीने बंदर आणि समुद्रातील सर्व सैन्य चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या शेणीच्या 3 पाणबुडय़ा पूर्वीच नौदलात तैनात आहेत.