वाळपई प्रतिनिधी
वेगळे सत्तरी येथील गोदरेज एग्रोवेट कंपनीच्या आवारात असलेला 13 फूट लांबीच्या किंग कोब्राला जीवदान देण्यात आले. सर्पमित्र प्रदीप गंवडळकर यांनी शिताफीने या किंग कोब्राला पकडला.
याबाबतची माहिती अशी की वेगळे सत्तरी येथील गोदरेज एग्रोवेट कंपनीच्या आवारात किंग कोब्रा असल्याची माहिती सर्पमित्र प्रदीप गंवडळकर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला शिताफीने पकडले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सदर किंग कोब्रा 13 फूट लांबीचा असून अत्यंत घातक असल्याचे प्रदीप यांनी स्पष्ट केले . सदर किंग कोब्रा रानामध्ये पळण्याच्या तयारीत होता. मात्र आपण प्रसंगावधान राखून त्याला पकडले .सध्यातरी त्याचा ताबा बोंडला प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱयांकडे