सांखळी/प्रतिनिधी :
सांखळी मतदारसंघातिल वेळगे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आज सवरीभाट वेळगे येथील प्रभाग सात मधील पंच महेश गवंडे यांची बिनविरोध निवड झाली गोविंद गावकर यांनी सरपंचपदा चा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते प्रभाग सात मध्ये गेल्या 19 वर्षानी सरपंच मिळाल्याने स्थनिक मतदारांनी पंचायत कार्यालयात बरीच गर्दी केली होती गवंडे यांच्या समर्थकांनी त्याचे खास अभिनंदन केले
आज सकाळी पंचयात कार्यालयात झालेल्या बैठकीत महेश गवंडे यांची निवड करण्यात आली यावेळी उपसरपंच उन्नती सहस्त्रबुद्धे, पंच सामंता कामत, मुकेश घाटवळ,केदार घाडी, दुर्गदास नाईक गोविंद गावकर ,यांची उपस्थिती होती
सुचक गोविंद गावकर अनुमोदन उन्नती सहत्रबुद्धे यांनी दिले निरिक्षक म्हणून अधिकारी नवनाथ आमरे ,उपस्थित होते सचिव नितीन शेट् यानी त्यास सहकार्य केले
मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने गावचा विकास साधणार :सरपंच
आपल्या देशासमोर कोरोना महामारीचे संकट असुनही सरकारने लोकहितार्थ अनेक योजना आखल्या आहेत, या बद्दल भाजप सरकारचे अभिनंदनआत्मनिर्भर भारत,आणि स्वयंपूर्ण गोवा हे तत्त्व सांभाळून मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने गावचा सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नसिल राहीन तसेच गावातील विविध सामाजिक प्रश्न सरकार दरबारी नेऊन ते सोडून वेळगे गावात भाजप सरकारची एक नवी ओळख निर्माण करण्यासाठी माझे कार्य सुरूच राहील असे मत सरपंच महेश गवंडे यांनी आज तरुण भारतशी बोलताना व्यक्त केले तसेच वेळगे गावातील अधिक लोक खनिज खाणवर अवलंबून,गैरेंज, ट्रक मालक आणि खाण कामगार याचे ही विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या सहकार्य घेऊन सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे कारण माझा गाव माझी जवाबदारी असे ही ते म्हणाले