मडगाव : गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील वेळसाव स्पोर्ट्स क्लब आणि सेसा फुटबॉल अकादमी यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत संपली. काल हा सामना जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आला. मध्यंतरावेळी वेळसाव क्लब एक गोलने आघाडीवर होता. पहिल्या सत्रातील सामन्यावर वेळसाव क्लबचे वर्चस्व आढळून आले. सामन्याच्या 32व्या मिनिटाला क्लूझनर परेराने 30 यार्डवरून हाणलेली फ्रिकीक सेसा फुटबॉल अकादमीचा गोलरक्षक सपन सिंगला भेदून जाळीत जाऊन विसावली. या आघाडीनंतर लगेच वेळसाव क्लबची आघाडी वाढविण्याची संधी हुकली. यावेळी सॅवलोन कार्दोझचा गोल करण्याचा यत्न सेसाचा गोलरक्षक सपन सिंगने उधळला. 57व्या मिनिटाला झालेल्या सेल्फ गोलने वेळसाव क्लबची विजय नोंदविण्याची संधी हुकली. विराज नाईक याच्याकडून हा सेल्फ गोल झाला. त्यानंतर शेवटच्या क्षणी वेळसावच्या जॉस्ली मॉनिज आणि सेसा फुटबॉल अकादमीच्या कॅजिटनचे गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले. आज शनिवारी या स्पर्धेत कुडचडेच्या गार्डीयन एँजल स्पोर्ट्स क्लबचा सामना धेंपो स्पोर्ट्स क्लबशी होणार आहे.
Previous Articleकिल्ले अजिंक्यताऱ्याचा मार्ग होणार प्रकाशमान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.