बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना लाटेची दुसरी संभावना असताना पालक व शाळा व्यवस्थापनाची भीती दूर करीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने बुधवारी स्पष्ट केले की कर्नाटकमध्ये दहावी व बारावीचे वर्ग १ जानेवारीपासून वेळापत्रक न बदलता पुन्हा सुरू होतील, असे म्हंटले आहे.
माध्यमांना उद्देशून शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी स्पष्टीकरण देताना शाळा पुन्हा सुरू करण्यात कोणताही बदल होणार नाही. जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स घेताना मंत्री सुरेश कुमार यांनी वर्ग पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले. मंत्री सुरेश यांनी आम्ही सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी शाळा सुरु करण्याबाबत चर्चा केली आणि त्यांना विभाग आणि सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले.
कडक नियम आणत मंत्री सुरेश यांनी शिक्षकांनी सुरक्षेची दखल घेऊन मास्क घालणे बंधनकारक असेल असे सुरेश कुमार म्हणाले. तथापि, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिड-डे जेवण दिले जाणार नाही. त्याऐवजी किराणा किट त्यांना वितरित केला जाईल.
एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले, आम्हाला समजले आहे की आर्थिकदृष्ट्या गरीब समाजातील मुले आहेत. परंतु कोरोना तांत्रिक सल्लागार समितीने केंद्राच्या आदेशानुसार आम्हाला मध्यान्ह भोजन देण्याची परवानगी दिली नसल्याचे सांगितले.