प्रतिनिधी / सातारा
सोळशी घाटातुन सोळशीवरून वेळेकडे सुसाट वेगाने जाणाऱ्या वाळूच्या डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकी चालकास आज सकाळी ठोकर दिली.या अपघातात दुचाकी चालक अमोल सुभान भोसले (वय 34,रा.नांदवळ, ता कोरेगाव) याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, डंपर चालकाने ठोकर मारून निघून जाऊन वाळू खाली करून तेथे डंपर आणून लावला.
याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संतोष उत्तम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सोळशी ते वेळे या रस्त्यावर वेळे गावच्या हद्दीत डंपर क्रमांक एमएच 11 सीएच 5667 हा चालक श्रेयस राजेंद्र परामणे ( रा.वाई ) याने जोरदार वेगाने चालवत मंदिरच्या परिसरात समोरून येणारी पल्सर दुचाकी एम एच 12 ई के 8363 ला जोराची धडक दिली.अन् डंपर न थांबता तसाच निघून गेला.या अपघातात दुचाकी चालक अमोल भोसले गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातल्या डॉक्टर यांनी मृत झाल्याचे सांगितले. नंतर वाळू खाली करून दुपारी डंपर चालकाने डंपर घटनास्थळी आणून उभा केला.या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम.के.कदम करत आहेत.