वृत्तसंस्था/ व्हर्जिनिया वॉटर
ब्रिटनचा व्यावसायिक गोल्फपटू ली वेस्टवूडची 2020 सालासाठी युरोपियन गोल्फ टूरवरील सर्वोत्तम गोल्फपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. 47 वर्षीय वेस्टवूडने हा पुरस्कार चौथ्यांदा मिळविला आहे.
आपल्या 27 वर्षांच्या गोल्फ कारकीर्दीमध्ये वेस्टवूडने अबु धाबी चॅम्पियनशीप गोल्फ स्पर्धा जिंकली आहे. युरोपियन गोल्फ टूरवरील 2020 च्या अखेरीस वेस्टवूड हा सर्वोत्तम गोल्फपटू ठरला आहे. यापूर्वी त्याने गोल्फ मानांकनात या दौऱयावर तीनवेळा अग्रस्थान मिळविले आहे.