ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकेतील डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पटापाउटियन यांना यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या दोन्ही संशोधकांना शरीरातील तापमान, दाब आणि वेदना निर्माण करणाऱया रिसेप्टर्सच्या शोधासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्टॉकहोममधील कॅरोलिन्स्का इन्स्टिटय़ूटमधील एका पॅनेलद्वारे पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
डेव्हिड ज्युलियस कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर पटापाउटियन आर्मेनियन वंशाचे अमेरिकन नागरिक असून ते ला जोला येथील स्क्रिप्स इन्स्टिटय़ूटमध्ये शास्त्रज्ञ आहेत. मागील वषी वैद्यकशास्त्रात हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना देण्यात आला होता. त्या शास्त्रज्ञांनी यकृताला हानी पोहोचवणाऱया हिपॅटायटीस सी विषाणूचा शोध लावला होता.