ऑनलाईन टीम / लंडन :
दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या 99 वर्षांच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने कोरोनाविरोधातील लढाईत सहभाग घेत वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 20 कोटी रुपयांचा निधी जमवला आहे.
कॅप्टन टॉम मूर असे या माजी लष्करी अधिकाऱ्याचे नाव आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेला मदतीची गरज आहे. देशासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी कोरोना लढाईत सहभागी असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी निधी जमवण्यास सुरुवात केली आहे.
वयाच्या 99 व्या वर्षी या माजी अधिकाऱ्यांची जिगर पाहून ब्रिटनमधील नागरिकांनी मदत करण्यात पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी 20 कोटी रुपयांचा निधी जमवला आहे. हा निधी ते डॉक्टर, नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी करणार आहेत. कॅप्टन मूर हे येत्या 30 एप्रिल रोजी 100 वर्षांचे होणार आहेत.