ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीहून शनिवारी सकाळी मॉस्कोला एअर इंडिया चे विमान चालले होते. मात्र, उड्डणा दरम्यान, अर्ध्या वरूनच विमानाला पुन्हा दिल्लीला माघारी बोलावण्यात आले. विमानाच्या वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ह्या विमानाला माघारी यावे लावले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी या विमानेने मॉस्को ला जाण्यासाठी उड्डाण केले. दरम्यान उड्डाणाआधी क्रू मेंबर्स चे रिपोर्ट चेक केले जातात. त्यामध्ये सुरुवातीला अहवाल पहिला असता तो निगेटीव्ह आहे, असे अधिकाऱ्यांना वाटले. पण पुन्हा एकदा अहवाल चेक केला असता वैमानिकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोल द्वारे विमानाशी संपर्क साधून ते विमान माघारी बोलावण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
सुदैवाने यावेळी विमानात कोणी नव्हते. पण नियमानुसार क्रु मेंबर्सना विलगीकरण करण्यात आले आहे. तर संपूर्ण विमान सॅनिटाईज केले जाणार आहे. तर रशियात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी दुसरे वीमान पाठविण्यात येणार आहे.