कोरोनामुळे जिल्हा परिषद बजेटला 50 टक्के कात्री
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोना विषाणूमुळे जिल्हा परिषदेच्या बजेटला 50 टक्के कात्री लागली आहे. याचा दृश्य परिणाम यावेळी जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांवर होत आहे. यावषी व्यक्तिगत लाभाच्या योजनांचे मोठय़ा प्रमाणात प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. परंतु अनुदानाअभावी मर्यादित लोकांना लाभ देता येणार असल्याचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी पशुधन व दुग्धविकास समिती सभेत सांगितले.
समितीची सभा सभापती म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ऑनलाईन झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, सदस्या रोहिणी गावडे, मनस्वी घारे, अनुश्री कांबळी, स्वरुपा विखाळे, अनुप्रिती खोचरे, मानसी धुरी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, कणकवली सभापती दिलीप तळेकर यांचे आई-वडील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुदन बांदिवडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
समिती सदस्यांना प्राधान्य द्या!
यावेळी सदस्या सौ. विखाळे यांनी पशु विभागाच्या व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्ये जिल्हय़ातील किती लाभार्थ्यांना लाभ मिळणार, असा प्रश्न केला. यावेळी अध्यक्ष म्हापसेकर यांनी, यावषी जिल्हा परिषद बजेटला 50 टक्के कात्री लागली आहे. परिणामी आपल्या विभागाला नियोजित निधीच्या 50 टक्केच निधी मिळणार आहे. त्यामुळे यंदा दरवषीच्या तुलनेत कमी संख्येने लाभ मिळणार आहे. यावेळी रोहिणी गावडे यांनी जो लाभ मिळणार आहे, त्यात समिती सदस्यांना
प्राधान्य द्यावे. अन्य समितीत त्या-त्या समिती सदस्यांना प्राधान्य दिले जाते, याकडे म्हापसेकर यांचे लक्ष वेधले. यावर म्हापसेकर यांनी सदस्यांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले.
15 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव स्वीकारणार
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिंपी यांनी एक सप्टेंबरपासून जिल्हय़ात राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ती सुरू राहणार आहे. ज्या ठिकाणी रिक्त पदे आहेत, त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने खासगी सेवा देणारे डॉक्टर किंवा सेवानिवृत्त डॉक्टर घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एका जनावराला टॅगिंग केल्यावर पाच रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती दिली. तर सभापती म्हापसेकर यांनी अद्याप व्यक्तिगत लाभाचे प्रस्ताव निश्चित करण्यात आलेले नाहीत. 15 ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रस्ताव काढून लाभार्थी निश्चित करण्यात येतील, अशी माहिती दिली.