प्रतिनिधी /बेळगाव
समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज, युवा संघटना व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 6 रोजी काकडीपासून गोड व तिखट पदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 30 स्पर्धकांनी भाग घेतला. परीक्षक म्हणून धनश्री हलगेकर यांनी काम पाहिले. त्यांनी स्वयंपाक करत असताना कोणत्या टिप्स वापराव्यात, याविषयी मार्गदर्शन केले.
प्रारंभी दिवंगत लता मंगेशकर, अभिनेते रमेश देव व समाजातील नुकतेच निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला बैलूर यांनी परीक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंडळाच्या सचिव लक्ष्मी बिडीकर, उपाध्यक्ष जयश्री हणमशेट, सुनिता बापशेट, मनीषा हणमशेट, अक्षता व अश्विनी कलघटगी, प्रणाली कपिलेश्वरी व सल्लागार तसेच सभासद यावेळी उपस्थित होत्या. बक्षीस वितरण समारंभ दि. 14 रोजी समादेवी पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर रात्री 8 वाजता होणार आहे.