बेळगाव / प्रतिनिधी :
वैश्यवाणी समाजाच्या हळदीपूर कृष्णाश्रम मठाचे मठाधीश प. पू. श्री वामनाश्रम स्वामीजींचे गुरुवारी सायंकाळी गोवावेस शहापूर येथील चिदंबर राजाराम समाधी मठात आगमन झाले. यावेळी समस्त वैश्य समाज बांधव आणि वैश्य शाखा मठाच्यावतीने स्वामीजींचे स्वागत करण्यात आले. वैश्य शाखा मठाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष बापुसाहेब अनगोळकर यांच्या हस्ते वामनाश्रम स्वामीजींचे स्वागत करण्यात आले. यावेळी समाजाच्या महिलावर्गाने स्वामीजींचे औक्षण केले.
स्वामीजींनी चिदंबर राजाराम समाधीचे दर्शन घेऊन उपस्थित समाज बांधवांना आशीर्वचन केले. यानंतर फलार्चन कार्यक्रम झाला. गुरुसेवा समितीचे अध्यक्ष विशाल मुरकुंबी, उपाध्यक्ष सुभाष अंगडी, सचिव शाम नाकाडी, अशोक मुरकुंबी, मधुसुदन किनारी, के. आर. बापशेठ, विजयकुमार मुरकुंबी, अविनाश बिडीकर, शेखर दळवी यांच्यासह वर्षा सटवानी, अंजली किनारी, प्रियांका मुरकुंबी, सीमा सटवानी, सुमती कुदळे, अनुजा बाळेकुंद्री यांच्यासह लोंढा, खानापूर, नंदगड, हल्याळ, बिडी या भागातील समाजबांधव उपस्थित होते. स्वामीजींनी बेळगावातील कार्यक्रमानंतर चंदगडला प्रस्थान केले.