प्रतिनिधी /बेळगाव
श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाजातर्फे रामनाथ मंगल कार्यालय येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रारंभी समादेवी माता व समाजाचे गुरू वामनाश्रम स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारती केसरकर, अश्विनी कलघटगी, अर्चना कपिलेश्वरी, लक्ष्मी बिडीकर यांनी स्वागत गीत सादर केले.
प्रमुख पाहुण्या डॉ. विद्या मुरकुंबी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतुरकर, रवी कलघटगी, विश्वस्त मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, महिला मंडळाच्या अध्यक्षा शीला बिडीकर, सचिव वर्षा सटवाणी उपस्थित होत्या. समाजातील दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दत्ता कणबर्गी, शीला बिडीकर यांनी विचार व्यक्त केले. विद्या मुरकुंबी यांनी कोजागरी पौर्णिमा व त्याला असलेली वैज्ञानिक जोड याबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन प्रसाद निखारगे यांनी केले. अमित कुडतुरकर यांनी आभार मानले.