मोरजी/प्रतिनिधी :
रोटरी क्लब, पेडणेतर्फे कोरगावच्या श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाची बारावी कला शाखेची विद्यार्थिनी वैष्णवी रामदास च्यारी हिला मोबाईल संच भेट दिला. यावेळी श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुदन बर्वे, अध्यापक विठोबा बगळी, रामदास च्यारी उपस्थित होते.
वैष्णवी हरमल येथील असून तिचे वडील सुतारकाम करतात. वैष्णवीजवळ मोबाईल नसल्याने ती ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नव्हती. तिची गरज लक्षात घेऊन रोटरी क्लब पेडणेचे संस्थापक अध्यक्ष तथा मोरजीच्या पिटर अल्वारीस हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक दयानंद मांदेकर यांनी तिला स्वखर्चातून मोबाईल संच उपलब्ध करून दिला आहे. वैष्णवी ही हुशार विद्यार्थिनी असून ती बारावी कला शाखेत शिकत आहे.
पेडणे रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष दयानंद मांदेकर यांचे प्राचार्य बर्वे यांनी आभार मानले.