कटरा
1 नोव्हेंबरपासून प्रतिदिन 15 हजार भाविकांना वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेण्याची अनुमती असणार आहे. कोरोना महामारीमुळे यापूर्वी 7 हजार भाविकांनाच दर्शन घेण्याची अनुमती होती. परंतु निर्बंधासंबंधीचे दिशानिर्देश 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे जम्मू-काश्मीर प्रशासनाने म्हटले आहे. मंदिर व्यवस्थापनाने कोरोना महामारीमुळे सुमारे 5 महिन्यानंतर 16 ऑगस्ट रोजी त्रिकुटा पर्वतावर स्थित मंदिर पुन्हा खुले केले होते. प्रारंभिक काळात श्री माता वैष्णोदवी श्राइन बोर्डाने यात्रेच्या पहिल्या आठवडय़ात प्रतिदिन 2 हजार भाविकांना अनुमती दिली होती. यात बाहेरील 100 भाविकांना अनुमती मिळाली होती. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणीच केली जात आहे.