मंदिराच्या गुहेपासून 100 मीटरच्या अंतरावर आग
वृत्तसंस्था/ जम्मू
वैष्णो देवी मंदिर परिसरात मंगळवारी संध्याकाळी भीषण आग लागली आहे. या आगीच्या ज्वाळा आणि धूर दूर अंतरावरून दिसून आला आहे. मंदिराच्या गुहेपासून 100 मीटर अंतरावरील कालिका भवनानजीक काउंटर क्रमांक 2 वर ही आग लागल्याचे समजते. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाच्या सीईओंनी सांगितले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिर परिसरात आग लागल्याबद्दल समजताच अग्निशमन विभागाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तेथे उपस्थित लोकांच्या मदतीने आग विझविली आहे. आगीत कुणीच होरपळल्याचे वृत्त नाही.