प्रतिनिधी/ बेळगाव
वॉकिंगला गेलेल्या उत्तरप्रदेशमधील एका वृद्धाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हनुमाननगर येथे घडली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
मूळचे जमशेदपूर येथील राहणारे परमानंद मिस्त्राr (वय 59) यांनी शुक्रवारी रात्री एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोघा जणांनी परमानंद यांच्या जवळील सुमारे 11 हजार रुपये किमतीचा मोबाईल संच व त्यांच्या खिशातील 400 रुपये पळविले आहेत.
हिंडलगा गणेशमंदिराजवळ असलेल्या नातेवाईकांच्या घरी आलेले परमानंद शुक्रवारी सायंकाळी वॉकिंगसाठी गेले होते. हनुमाननगर डबल रोडवरून घरी जाताना एक्सीस बँकेजवळ मोटारसायकलवरून दोघेजण आले. त्यांना चाकूचा धाक दाखविला व त्यांच्याजवळील मोबाईल व रोकड घेऊन तेथून पसार झाले. यावेळी झालेल्या झटापटीत परमानंद जखमी झाले आहेत. पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ पुढील तपास करीत आहेत.