प्रतिनिधी / बेळगाव
माजी उपमहापौर संजय शिंदे यांनी वॉर्ड क्र. 21 मधील मनपाच्या सफाई कामगारांचा सत्कार केला. कोरोनाच्या काळातही स्वतःचा जीव धोक्मयात घालून स्वच्छता कर्मचारी सेवा बजावत आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सर्व कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला.
वॉर्डच्या निरीक्षिका शिल्पा कुंभार, सुपरवायझर संजय पाटील यांचा शाल व जॅकेट देऊन सत्कार करण्यात आला. त्याचसोबत सर्व महिला कामगारांचा शाल, साडी, श्रीफळ व मिठाई देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र जाधव यांनी केले. बिंबा कोलकार, माला मुचंडी, लक्ष्मी चलवादी, तुळसा कोलकार, सलोमी यांडोरी, सूरज चालगार, प्रकाश बामण्णवर, प्रभावती शिंदे या महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुजाता शिंदे, रिया शिंदे, कला अनगोळकर, सुनंदा शिंदे, अतिश शिंदे, अवधुत पवार, ज्योती शिंदे, भाऊ शिंदे, अरुण बिर्जे, संतोष संकण्णावर यांच्यासह इतर उपस्थित होते.