द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत उपलब्धतेविषयी साशंकता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची बाधा झाली असून यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱया आगामी वनडे मालिकेत तो खेळू शकणार का, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. वॉशिंग्टन सुंदर जवळपास मागील वर्षभरापासून मुख्य प्रवाहातून बाहेर होता. त्यानंतर यंदा मार्च महिन्यात त्याने शेवटचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीत्व केले. विजय हजारे चषक स्पर्धेत त्याचा तामिळनाडू संघात समावेश होता. त्या स्पर्धेतील दमदार योगदानाची दखल घेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी त्याला संधी देण्यात आली होती. उभय संघातील 3 सामन्यांची मालिका दि. 19 पासून सुरु होईल.