प्रतिनिधी /बेळगाव
माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील मुलांना वोसॅप गुपच्या वतीने स्मार्ट केनचे वितरण करण्यात आले. शहापूर येथील फिजिकल हॅन्डिकॅप असोसिएशनचे अध्यक्ष राघवेंद्र अणवेकर यांनी वोसॅप या संघटनेची माहिती दिली. दिव्यांग व्यक्तींना आवश्यक वस्तू व आर्थिक साहाय्य देण्याचे काम ही संघटना करीत आहे.
प. पू. गुरुसिद्ध स्वामीजी व डॉ. राजशेखर यांनी विद्यार्थ्यांना स्मार्ट केन दिले. यावेळी राजेश्वरी सवरगीमठ, वासंती कुलकर्णी, उमेश कलघटगी, राजेश वाय., गिरीष सव्वाशेरी, अरिफ उदयपूर, पृथ्वी नारळेकर, प्रज्वल नारळेकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजशेखर आणि संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी यांनी मार्गदर्शन केले.
अरविंद उदोशी यांनी परिचय करून दिला. सुमिता मिटगार यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी आभार मानले. यावेळी आनंद जोशी, गणेश हेगडे, राजेंद्र जैन, वालकिशन भट्टड, चिंतामणी ग्रामोपाध्याय. अशोक चिंडक, ओमप्रकाश भंडारी, यल्लाप्पा नारळेकर उपस्थित होते.