नवी दिल्ली
भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्यातदारांसाठी व्याज सवलतीच्या योजनेची मुदत जून 2021 पर्यंत वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे. त्यामुळे निर्यातदारांना या योजनेचा लाभ 30 जून 2021 पर्यंत घेता येणार आहे. या महिन्यापासून आणखी 3 महिने व्याज सवलतीचा लाभ निर्यातदारांना घेता येणार आहे. याने निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी ही मुदत 31 मार्च 2021 रोजी संपणार होती. भारतीय निर्यातदारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीच सदरची मुदत वाढवून दिली असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.