कॉलेजलाईफमध्ये काहितरी ‘हटके’ करण्याची उमेद प्रत्येकामध्ये असते. कॉलेजमध्ये साजरे होणारे ‘डे’ असो वा ‘युवा महोत्सव’. यामधून तरूणाईच्या कलागुणांना वाव मिळावा, असा प्रयत्न असतो. एकास एक हटके महोत्सव लिंगराज महाविद्यालयात साजरा करण्यात आला. कॉलेजलाईफपासून उद्योग कसा करावा, त्याची विक्री कशी करावी हे समजण्यासाठी ‘व्यापारोत्सव’चे आयोजन करण्यात आले होते.
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना बिझनेस कसा करावा? याची माहिती व्यवस्थापनाचे महत्त्व, विक्रीच्या क्ल=Hत्या शिकाfवल्या जातात. परंतु प्रत्यक्षात ते राबविताना विद्यार्थ्यांना असंख्य समस्या येत असतात. त्यांना हि कौशल्ये प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात जाणून घेता यावी याकाfरता हा महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरला. यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, साहित्य विक्री ठेवण्यात आले होते. त्यामुळे लिंगराज कॉलेजच्या पाfरसरात सोमवारी बाजाराचे स्वरूप आले होते.
चमचमीत पाणीपुरी, भेळ, वडापाव, दाबेली आपण स्टॉलवर अनेकवेळा खातो, परंतु विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन शिकून ती तयार केली होती. त्याचबरोबर सामोसा, कचोरी, आंबील, मसाला ताक, फेरणी, फ्रुट सॅलेड यासारखे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवण्यात आले होते. याचबरोsबर विद्यार्थिनींनी बनविलेल्या बॅग्ज, इतर माfहलांचे साहित्य तरूणींचे लक्ष वेधून घेत होते.
विद्यार्थ्यांना अभ्यासातtन विरंगुळा मिळून त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचा हा एक प्रयत्न होता. विद्यार्थ्यांनी एक एक संस्कृती घेऊन त्या पद्धतीचा पोषाख करून साहित्याची विक्री केली. दाक्षिणात्य, पंजाबी, राजस्थानी, बंगाली, महाराष्ट्रीयन अशा प्रकारच्या खाद्यपदार्थाbची रेलचेल या महोत्सवात होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेऊन धमाल केली.