ऑनलाईन टीम / हनोई :
व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट भारत आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या बी.1.617 व्हेरिएंटशी मिळताजुळता असून, तो हवेतून वेगाने पसरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हिएतनामचे आरोग्य मंत्री गुयेन थान लॉन्गने म्हणाले, व्हिएतनाममध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना संक्रमित रुग्णांची जेनेस्टिक स्टडी केली. यामध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट समोर आला. यापूर्वी व्हिएतनाममध्ये कोरोनाचे सात व्हेरिएंट आढळले आहेत. देशातील वाढत्या कोरोना संक्रमणामागे नवा व्हेरिएंट असू शकतो. देशातील तीसपेक्षा जास्त भागात हा विषाणू पसरल्याने देशात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नव्या विषाणूने किती लोक बाधित आहेत, याची आकडेवारी समोर आलेली नाही.
दरम्यान, या विषाणूने प्रभावित तीस संक्रमित भागातील धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पब्लिक पार्क, रेस्टॉरंट, बार बंद ठेवण्यात आले आहे.