वृत्तसंस्था/ टोकियो
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पुरूष एकेरीच्या बॅडमिंटन प्रकारात ग्वाटेमालाचा बॅडमिंटनपटू केव्हिन कॉर्डनची विजयी घोडदौड अखेर डेन्मार्कचा द्वितीय मानांकित व्हिक्टर ऍक्सलसनने रोखली. यामुळे या क्रीडाप्रकारातील कॉर्डनचे आव्हान संपुष्टात आले आहे. आता डेन्मार्कचा व्हिक्टर ऍक्सलसन आणि चीनचा चेन लाँग यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल.
बॅडमिंटन प्रकारातील पुरूष एकेरीच्या रविवारी झालेल्या उपांत्य सामन्यात डेन्मार्कच्या ऍक्सलसनने कॉर्डनचा 21-18, 21-11 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. त्याचप्रमाणे 2016 चा रिओ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया चीनच्या चेन लाँगने इंडोनेशियाच्या अँथनी गिनटिंगचा 21-16, 21-11 असा पराभव करत पुन्हा सलग दुसऱयांदा ऑलिंपिकचे सुवर्णपदक मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.