वेल्लोर
वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटचा (व्हीआयटी) समावेश भारतामधील सर्वोत्कृष्ट असलेल्या 12 इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटपैकी एक आणि क्मयुएस मानांकन 2021 च्या नुसार जगामधील सर्वोत्कृष्ट अशा 450 विद्यापीठांपैकी एक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
क्मयुएसद्वारे यावषी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये व्हीआयटीमधील सात विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी प्रामुख्याने कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फर्मेशन सिस्टीम, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग (ईईई), मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि केमिस्ट्रीच्या चार विषयांचा समावेश असून गेल्या वषीच्या तुलनेमध्ये यावषी 50 स्थाने पुढे आला आहे. त्यापैकी कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फर्मेशन सिस्टीम, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा (ईईई) चा भारतामधील पहिल्या 10 संस्थांमध्ये समावेश आहे. जागतिक स्तरावरचा विचार करायचा झाल्यास इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग (ईईई) पहिल्या 300 संस्थांमध्ये तर कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फर्मेशन सिस्टीम आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पहिल्या 400 मध्ये समावेश झालेला आहे. व्हीआयटीच्या मॅथेमॅटिक्स आणि बायोलॉजी या विषयांचा यावषी पहिल्यांदाच क्मयुएस विषयांच्या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
2021 या वर्षासाठी क्मयुएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगद्वारे 51 विभागांच्या विविध अशा 5 श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली आहे. क्मयुएस वर्ल्ड टेक्नॉलॉजी रँकिंग या संस्थेद्वारे एखाद्या विषयासाठी कोणते विद्यापीठ चांगले आहे, याचे सर्वेक्षण करत असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.