प्रतिनिधी / बेळगाव
विजया ऑर्थो व ट्रॉमा केअर सेंटर (व्हीओटीसी) चे डॉ. रवी पाटील, संपर्क प्रमुख विरेश हिरेमठ यांनी सुरूते ग्राम पंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी सरपंच मारुती पाटील व नारायण पाटील यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करण्यात आला. उपसरपंच नागोजी नाईक यांनी गावातील आरोग्याच्या समस्या मांडल्या.
यावेळी डॉ. रवी पाटील म्हणाले, व्हीओटीसीतर्फे गावातील प्रत्येक कुटुंबाला एक कार्ड देण्यात येईल, ज्याद्वारे रुग्णाला गरज पडल्यास माफक दरात उपचार करण्यात येतील. लवकरच गावातील सर्वांसाठी मोफत शिबिर घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीने केलेल्या वृक्ष लागवडीचे व उपसरपंच नागोजी नाईक यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. गावचे पुरोहित सातू भाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गावातील ज्ये÷ नागरिक रामचंद्र चोपडे, खाचो चिखले, यल्लाप्पा पाटील, दुर्गाराम पाटील, धाकलू भाटे, शिवाजी कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज कांबळे यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रामसेवक विनय संभाजी यांनी केले.