बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक शिवाजीराव बी. पाटील यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले.
प्रारंभी विद्यार्थिनींनी पाळणागीत व पोवाडा सादर केला. मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तसेच जीवनात शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे आचरण करण्याचे सांगितले.
प्रास्ताविक शिक्षक पी. एम. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ए. पी. नाकाडी यांनी करून आभार मानले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना गोड बुंदीचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी सहशिक्षक ए. बी. पाटील, एस. एच. पाटील, एस. आर. कम्मार, जे. डी. बिर्जे, आर. ए. देसूरकर, एस. एन. पाटील, पी. के. पाटील, के. बी. रंगाई, के. एस. सुळगेकर, संभाजी देसाई, अनिता गुंडोजी, नीता पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.