अलतगा येथे कडोलकर बंधूंकडून पेट्रोलपंपची उभारणी : आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर /उचगाव
दळवळणमधील महत्त्वाचा दुवा ठरतो तो इंधन. इंधन नसेल तर आपली वाहने धावू शकणार नाहीत. यासाठी प्रवाशांच्या मार्गावर अशा पेट्रोलपंपांची नितांत गरज आहे. ही गरज ओळखून कडोलकर बंधूंनी समाजाची सेवा म्हणून हे काम हाती घेतले आहे. अशी सेवा समाजासाठी त्यांच्याकडून घडो, असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी अगसगा क्रॉस, अलतगा येथील व्ही. के. पेट्रोलियमच्या उद्घाटन समारंभप्रसंगी उद्घाटक या नात्याने केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिवाड ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सावित्री कडोलकर होत्या. बेळगाव-कडोली मार्गावरील अगसगा क्रॉस अलतगा येथील व्ही. के. पेट्रोलियम या नूतन पेट्रोलपंपाचा उद्घाटन समारंभ सोमवारी
दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी पेट्रोलपंप मशीनचे पूजन सावित्री कडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. ऑफिसचे उद्घाटन राहुल सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. फोटो पूजन एपीएमसीचे अध्यक्ष युवराज कदम, जिल्हा पंचायतचे माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे, एपीएमसीचे माजी सदस्य शिवाजी राक्षे यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन अडत व्यापारी अण्णू कटांबळे, कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतचे अध्यक्ष यल्लुप्पा पाटील, अगसगा ग्रा. पं. सदस्य आप्पयगौडा पाटील, कंग्राळी खुर्द ग्रा. पं. उपाध्यक्षा ज्योती पाटील, कडोली ग्रा. पं. अध्यक्षा श्रीदेवी पाटील, अलतगा ग्रा. पं. सदस्य चेतन कांबळे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी अगसगा ग्रा. पं. उपाध्यक्ष भैरू कंग्राळकर, अडत व्यापारी दीपक पाटील, अडत व्यापारी माणिक होनगेकर, अशोक बामणे, दयानंद पाटील, राजू मायाणाचे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत निंगाप्पा कडोलकर, कल्लाप्पा कडोलकर यांनी केले.
यावेळी ऍड. पूजा बिर्जे, धाकलू केदार, सोमनाथ पाटील, नागेश केदार, सूर्याजी बिर्जे, नारायण पटवर्धन, सुबराव पाटील, कल्लाप्पा कडोलकर, शिवाजी बोकमुरकर यांचा मल्लाप्पा कडोलकर, सातेरी कडोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या उद्घाटन समारंभप्रसंगी अण्णू कटांबळे, युवराज कदम, यल्लाप्पा पाटील, माणिक होनगेकर, एन. ओ. चौगुले, अरुण कटांबळे, चन्नराज हट्टीहोळी यांची शुभेच्छापर भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू पाटील यांनी केले. आभार मारुती बेळगावकर यांनी मानले. या पेट्रोल पंप उद्घाटन समारंभाला अतिवाड, उचगाव, कडोली, गोजगा, अलतगा भागातून नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.