महिलांची लाइक केलेली छायाचित्रेच प्रदान
एका महिलेची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली असून तिने स्वतःच्या पतीला व्हॅलेंटाईन दिनी अजीब भेटवस्तू दिली आहे. महिलेने स्वतःच्या पतीला अशा सर्व महिलांची छायाचित्रे प्रिंट करून भेटीदाखल दिली आहेत, ज्या छायाचित्रांना त्याने इन्स्टाग्रामवर लाइक केले आहे. त्यानंतर महिलेने समाजमाध्यमांवर चित्रफितही पोस्ट केली आहे. या भेटीमागे महिलेचा खरा उद्देश कोणता हे मात्र तिच्या पतीला अद्याप समजलेले नाही.
अमेरिकेतील ग्लोरिया नावाच्या टिकटॉक युजरने पतीला प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जाणाऱया दिवशी अजीब भेट दिली आहे. तिच्या चित्रफितीला एकाच दिवसात 1 कोटी 38 लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे.
ग्लोरियाने सर्वप्रथम अशा सर्व महिलांची छायाचित्रे इन्स्टाग्रामवरून डाउनलोड करत त्यांना प्रिंट केले आहे. त्यानंतर छायाचित्रांना एका काठीला चिकटवून व्हॅलेंटाईन डेची भेट म्हणून पतीला सोपविले आहे. प्रत्येक जण स्वतःच्या साथीदाराला भेटवस्तू देऊ पाहत आहे. मी देखील ‘क्यूट लिट्ल बॉक्स’ दिल्याचे ते चित्रफितीत म्हटले आहे. समाजमाध्यमांवर अनेकांनी ग्लोरियाचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत.
तिने स्वतःच्या पतीची प्रतिक्रियाही पोस्ट करावी असे एका व्यक्तीने नमूद केले आहे. पती अन्य महिलांच्या छायाचित्रांना दाद देऊ शकत नाही का अशी विचारणा एका वापरकर्त्याने केली आहे.