प्रतिनिधी/ बेळगाव
उद्यमबाग येथील व्हेगातर्फे कार्यरत असणाऱया पोलिसदलातील कर्मचाऱयांसाठी दोन हजार पाचशे मास्क, तीनशे पीपीई किटस् व एक हजार एन 95 मास्क देण्यात आले आहे.
सध्या लॉकडाऊनमध्ये पोलीसांवर अधिक ताण आहे. बंदोबस्तामध्ये व्यस्त असणाऱया पोलिसांसाठी कंपनीने हे साहित्य दिले आहे. दरम्यान पोलिस दलापैकी 66 पोलीस कर्मचारी व अधिकाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांचे विलीगीकरण करण्यात येऊन उपचार सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी स्पष्ट केले आहे.