साहित्य : बॉल्ससाठीः अर्धी वाटी किसलेलं गाजर, अर्धी वाटी फ्लावर किसलेला कोबी, अर्धी वाटी बारीक चिरलेली बीन्स, 1 चमचा तेल, चवीपुरते मीठ, चवीनुसार काळीमिरीपूड, 1 चमचा कॉर्नफ्लोर, तेल तळण्यासाठी, गार्लिक सॉससाठीः 2 चमचे लसूण चिरून, 1 चमचा तेल, अर्धा चमचा आलं खिसून, 1 चमचा हिरवी मिरची बारीक चिरून, पाव वाटी कांदापातीचा कांदा चिरून, 2 चमचे हिरवी कांदापात चिरून, दीड चमचा शेजवान सॉस, 1 चमचा सोयासॉस, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा साखर, पाव चमचा कॉर्नफ्लोर, चवीपुरते मीठ
कृती : गरम तेलात सर्व भाज्या व बॉल्ससाठी दिलेले साहित्य टाकून तीन ते चार मिनिटे परतवावे. मिश्रण गार झाले की एकसमान सहा भागात विभागून त्याचे बॉल्स बनवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. आता सॉसाठी गरम तेलात लसूण, आलं आणि हिरवी मिरची परतवून घ्यावी. नंतर त्यात कांदापातीचा पांढरा कांदा टाकून परतवावा. नंतर कांदापात, सर्व सॉस व इतर साहित्य आणि चमचाभर पाणी टाकून दोन मिनिटे मिश्रण शिजवावे. आता तयार बॉल्स खाण्यास देताना गार्लिक सॉसमध्ये मिक्स करून खाण्यास द्या.