वृत्तसंस्था / जेदाह ( सौदी अरेबिया)
2022 एफ-वन मोटार रेसिंग हंगामातील सलग दुसऱया शर्यतीला जर्मनीचा माजी विश्वविजेता चालक सेबॅस्टियन व्हेट्टेलला मुकावे लागणार आहे. व्हेट्टेलला यापूर्वी कोरोनाची बाधा झाली असून तो अद्याप यातून पूर्णपणे बरा झाला नसल्याने येथे होणाऱया सौदी अरेबियन ग्रा प्रि. एफ-वन मोटार रेसिंग शर्यतीमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
सौदी अरेबियन ग्रा प्रि एफ-वन मोटार रेसिंग शर्यतीमध्ये आता व्हेट्टेलच्या जागी निको हुकेनबर्गला अँस्टोन मार्टिन संघामध्ये बदली चालक म्हणून घेतले जाणार आहे. व्हेट्टेललचे वास्तव्य सध्या युरोपमध्ये असून त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. 8 ते 10 एप्रिल दरम्यान होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रा प्रि एफ-वन मोटार रेसिंग शर्यतीमध्ये व्हेट्टेल सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.