वृत्तसंस्था/ ऍकापुल्को (मेक्सिको)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या ऍकापुल्को पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या टॉप सीडेड ऍलेक्झांडर व्हेरेव्हने पहिल्या फेरीतील सामना तब्बल तीन तासांच्या कालावधीत जिंकताना ब्रुक्सबायचा पराभव केला.
सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात व्हेरेव्हने ब्रुक्सबायचा 3-6, 7-6 (12-10), 6-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली. हा सामना तीन तास 19 मिनिटे चालला होता. व्यवसायिक टेनिस क्षेत्रातील व्हेरेव्हचा हा एक दीर्घकालीन कालावधीतील विजय म्हणावा लागेल. आता व्हेरेव्हचा पुढील फेरीतील सामना गोझोविजेकशी होणार आहे. स्पेनच्या नदालचा पहिल्या फेरीतील सामना कुडलाशी होणार आहे.