कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापुरात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्य़ा टोळीला वन विभागासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून वनविभागाकडून या माहितीला दुजोरा मिळाला आहे.
दुर्मिळ अशी व्हेल माशाची उलटी सव्वा तीन किलो वजनाची असून या उलटीची बाजारात किंमत सव्वा तीन कोटी रूपये आहे. ही कारवाई न्यू पॅलेस आणि खानविलकर पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली या टोळीतील चौघेजण सांगलीतील रहिवाशी असून त्याच्याकडून मुद्दमाल, चारचाकी आणि दूचाकी ताब्यात घेतल्या आहेत.