खोटय़ा माहितीचे प्रसारण रोखण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगभरात वेगोन संसर्ग होत असणाऱया कोरोना विषाणूचे थैमान मोठय़ा प्रमाणात घातले आहे. आतापर्यंत 195 देशात हा कोरोना पसरला आहे. यामुळे कोटय़वधी लोकांना घरात बंदीस्त करुन ठेवले आहे. यामुळे नागरिक आता माहितीची देवाणघेवाण व्हॉट्सअपच्या माध्यमातून करत आहेत. परंतु ही माहिती किती प्रमाणात खरी आहे, यांची शहानिशा करण्यासाठी व्हॉट्सअप नवीन फिचर आणणार आहे.
कंपनी एक असे फिचर तयार करुन ग्राहकांपर्यंत आलेली माहिती ही खरी आहे. का खोटी यांची शहानिशा करणारी सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे खोटय़ा माहितीमुळे होणारा गोंधळातून सुटका होणार असल्याचे अनुमान मांडले आहे. व्हॉट्सअप नवीन फिचर मॅग्नीफाइग ग्लासच्या प्रमाणे तयार करणार आहे. एक आयकॉन ग्राहकाजवळ असणार व मॅसेजच्या जवळ हा दिसणार असून यातून मॅसेजचा आश्य व वेब ब्राउझरवर सर्च करणार असल्याचेही मुंबई मिररमध्ये सांगितले आहे.