वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात होणाऱया आगामी प्राईम व्हॉलीबॉल लीग स्पर्धेसाठी मंगळवारी कोचीत व्हॉलीबॉलपटूंचा लिलाव होणार आहे. सात विविध संघांच्या फ्रांचायझी मंगळवारी या लिलावात बोली लावणार आहेत.
कालिकत हिरोज, कोची ब्लु स्पायकर्स, अहमदाबाद डिफेंडर्स, हैद्राबाद ब्लॅक हॉक्स, चेन्नई ब्लिट्झ, बेंगळूर टॉर्पेडोज आणि कोलकाता थंडरबोल्ट्स या संघांचे फ्राचायझी व्हॉलीबॉलपटूंच्या लिलावामध्ये उपस्थित राहणार आहेत. या लिलाव प्रक्रियेत 400 व्हॉलीबॉलपटूंसाठी बोली लावण्यात येईल. प्रत्येक प्रँचायझी आपल्या संघात 14 खेळाडूंना घेणार असून त्यात 12 भारतीय व दोन विदेशी व्हॉलीबॉलपटूंचा समावेश असणार आहे. प्राईम व्हॉलीबॉल लीग स्पर्धेत एकूण 24 सामने खेळविले जाणार असून या स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती प्राईम व्हॉलीबॉल लीगचे सीईओ जॉय भट्टाचार्य यांनी दिली.