25 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात कंपनी व्यस्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्होडाफोन आयडिया (व्हीआय) चालू वर्षात 2021 ते 22 मध्ये आपली 3 जी सेवा बंद करण्याचे संकेत आहेत आणि कंपनी आता 4 जी सेवा कार्यान्वीत करण्यावर भर देणार असल्याची माहिती आहे. 2 जी सर्व्हिस ही आणखीन काही वर्ष चालणार असल्याचे स्पष्ट केले आहे, कारण देशातील सर्वसामान्य ग्राहकांची संख्या ही खूप मोठय़ा प्रमाणात कार्यरत असल्याचेही स्पष्ट केले आहे.
यावेळी कंपनीच्या एका वरि÷ अधिकाऱयाने म्हटले आहे, की कंपनी लवकरच 25,000 कोटी रुपयांचा निधी जमा करण्याची योजना आखणार आहे. या योजनेसाठी विविध गुंतवणूकदारांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती आहे. देशामध्ये आतापर्यंत 3 जी सेवेची आवश्यता नसून आगामी काळात काही निवडक ग्राहकच 3जी सेवा वापरण्यावर भर देणार असल्याचे कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी अक्षय मुंदरा यांनी विश्लेषकांना सांगितले आहे.
सध्याची ग्राहक स्थिती
कंपनीजवळ सध्याच्या घडीला 1.1 कोटी 3 जी ग्राहक संख्या आहे. यामुळे वर्ष 2022 पर्यंत 3जी सेवा समाप्त करण्याची दाट शक्मयता आहे. तर व्हीआयचे 2जी ग्राहक हे 14.9 कोटींवर राहिले आहेत.