प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या कट्टीमनी सभागृहात सोमवारी सकाळी प्रशासनातर्फे शंकराचार्य जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. कन्नड आणि संस्कृती विभाग व प्रशासन यांच्यातर्फे हा कार्यक्रम झाला. खात्याच्या संचालिका विद्यावती बजंत्री यांनी शंकराचार्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी श्रीरंग जोशी व खात्याचे कर्मचारी केंचप्पा मुरगोडी, मेहबुबी आदी उपस्थित होते.