प्रतिनिधी/ संकेश्वर
येथील ग्रामदैवत श्रीमद् जगद्गुरु श्री शंकराचार्य मठ सिद्ध सांख्येश्वर यात्रा व रथोत्सव दि. 6 ते 16 फेब्रुवारीअखेर होणार आहे. यानिमित्त वेदपारायण, महारुद्राभिषेक, रुद्रपंचायतन, श्रीसुक्त होमाचे आयोजन केले आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापकांनी केले आहे.
रविवार 6 रोजी सकाळी 10 वा. उदकशांती होम, रात्री 9 वा. अन्नपूर्णा कोठीपूजा, सोमवार 7 रोजी सकाळी 9 वा. रथपूजा, नवग्रह होम, बलिदान व म्हैराळ, ब्रम्हपूजा, महानैवद्य, मंगळवार 8 रोजी नित्यपूजा व दुपारी 2 वा. रथ श्री. नारायणेश्वर मंदिराकडे जाणार आहे. बुधवार 10 रोजी रथ श्री. बनशंकरी देवळासमोर राहणार आहे. गुरुवार 11 रोजी महायात्रा सकाळी आद्य श्री. शंकराचार्य विद्याशंकरभारती-देवगोसावी समाधीपूजा, तर सायंकाळी रथ मठाकडे परत आणला जाणार आहे. शुक्रवार 12 ते 16 फेब्रुवारी पर्यंत महारुद्र अभिषेक, रुद्रपंचायतन, श्रीसुक्तहोम होणार आहे.
चांदीच्या पालखीचे उद्घाटन
श्री शंकराचार्य मठावतीने चांदीची पालखी घडविण्यात आली आहे. सदर चांदीच्या पालखीचे उद्घाटन 7 फेब्रुवारी रोजी पादगुडी येथे दुपारी 3 वा. श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य संस्थानमठाचे पीठाधीश्वर सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती स्वामीजी व पंचम जगद्गुरु शिवलिंगेश्वर स्वामीजी सिद्धसंस्थान मठ-निडसोशी यांच्या हस्ते होणार आहे.