प्रतिनिधी / बेळगाव
एल्गार सामाजिक, साहित्य परिषद बेळगाव यांच्यावतीने पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील ज्ये÷ कवी महेंद्रकुमार गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून लेखक अनिल आजगावकर होते.
यावेळी बोलताना अनिल आजगावकर म्हणाले, सामाजिक भान निर्माण करून देणारे वाचन व्यक्तिमत्त्व समृद्ध करते. ज्ञानाच्या माध्यमातून अनेकांनी जगावर राज्य करण्यापर्यंत मजल तर मारलीच पण एक परिपूर्ण माणूस म्हणून घडण्यास सक्षम बनले आहेत.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक अलंकार आलासे (पंत बाळेकुंद्री), द्वितीय संजय येरणे (चंद्रपूर) तर तृतीय प्रवीणा बागूल (दक्षिण कोरिया) यांनी पटकाविला. आदिती आवडण, किशोर काकडे, केशव कुकडे, हर्षदा बंड, डॉ. सुप्रिया कदम, गीता ललित, मधुरा जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले आहेत.
या कार्यक्रमप्रसंगी वैजयंती गर्गे, विश्वनाथ शिंदे, तुकाराम कुऱहाडे, रवळनाथ यळ्ळूरकर आदी उपस्थित होते. प्रा. अशोक आलगोंडी यांनी प्रास्ताविक केले. स्वागत व सूत्रसंचालन प्रा. निलेश शिंदे यांनी केले. चंद्रशेखर गायकवाड यांनी आभार मानले.