प्रतिनिधी/ बेळगाव
यंदा महानगरपालिकेने 45 कोटी घरपट्टी वसुल करण्याचे उद्दी÷ ठेवले आहे. यापैकी 30 कोटी 16 लाख रूपये मालमत्ता कर जमा झाला आहे. उर्वरित 15 कोटी कर वसुलीसाठी येत्या अडिच महिन्यात मोहिम राबविण्याचा विचार मनपाने चालविला आहे. उद्दी÷ पूर्तीसाठी वॉर्डनिहाय पथक नियुक्ती करण्याचे काम सुरू झाले आहे.
शहरात 1 लाख 34 हजार 109 मालमत्ता आहेत. मात्र यापैकी 1 लाख 13 हजार 658 मालमत्ताधारकांनी कर बसवून घेतली आहे. उर्वरित 20 हजार 451 मालमत्तांना कर बसविण्यात आला नाही. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत आहे. एप्रिलपासून आतापर्यंत 30 कोटी 16 लाख रूपये कर जमा झाला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात 45 कोटी घरपट्टी जमा करण्याचे उद्दी÷ महापालिकेने निश्चित केले आहे. त्यामुळे आतापर्यंत 67 टक्के उद्दी÷ पूर्ण झाले आहे. कोरोना विषाणुचा प्रसार झाल्याने संपूर्ण शहर तीन महिने लॉकडाऊन होते. त्यामुळे घरपट्टी भरण्यास नोव्हेंबर पर्यंत मुभा देण्यात आली होती. तसेच जुलै अखेर पर्यंत 5 टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे कोरोना काळात लॉकडाऊन असूनही मालमत्ता जमा होण्याचे प्रमाण चांगले आहे. पण उर्वरित घरपट्टी वसुलीसाठी मोहिम राबविण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी महसूल विभागाच्या अधिकाऱयांना केली आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डमध्ये घरपट्टी वसुलीसाठी पथक नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
1 लाख 34 हजार 109 पैकी 10 हजार 232 व्यवसायीक मालमत्ता आहेत. त्यामुळे घरपट्टी जास्त मिळते. उर्वरित 15 कोटी घरपट्टी वसुलीसाठी महसुल विभागाकडे अडिच महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत 100 टक्के मालमत्ता कर जमा करण्यासाठी मनपा प्रशासनाने हालचाली चालविल्या आहेत. येत्या काही दिवसात वसुली पथकाच्या माध्यमातून घरपट्टी थकविलेल्या मालमत्ता धारकांना चलन देऊन काही अवधी देण्यात येणार आहे. तसेच वर्षानुवर्षे घरपट्टी थकविलेल्या नागरिकांना नोटीस बजावून कारवाई करण्याचा इशारा देण्याचा विचार महसूल विभागाने चालविला आहे.