v
पणजी
समाजोन्नती संघटनेचे अध्यक्ष तसेच माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर लिखीत ’अंतर्नाद’ पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
देश आणि समाजाचा विकास होण्यासाठी राजकीय भेद बाजूला सारून सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. समाजोन्नती संघटन ही अशीच भेदाभेद बाजूला सारून समाज विकासासाठी प्रयत्न करणारी संस्था आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन, नौवहन आणि बंदरे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. समाजोन्नती संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गांधी जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
गेली 42 वर्षे संघटनेचे अविरत काम सुरु आहे. संघटनेने उत्तरोत्तर असाच समाज विकास साधावा, शुभेच्छा श्रीपाद नाईक यांनी यावेळी दिल्या.
श्रीपाद नाईक यांच्या हस्ते कीर्तनकार विष्णुबुवा शेटगावकर आणि समाजोन्नती संघटनेचे विष्णू बांदेकर यांचा ’समाज मित्र’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच समाजोन्नती संघटनेच्या 42 वर्षांच्या कामाचा आढावा घेणाऱया स्मरणिकेचे प्रकाशन श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.