वृत्त संस्था/ ढाका
पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱयावर आला आहे. उभय संघात टी-20 मालिका 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान ढाक्यात खेळविली जाणार आहे. मात्र, या मालिकेत बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.
बांगलादेश संघातील अष्टपैलू शकीब अल हसन आणि शैफ उद्दीन यांना दुखापत झाली आहे. या टी-20 मालिकेसाठी बांगलादेशचा 16 जणांचा संघ जाहीर करण्यात आला. बांगलादेश संघाचे नेतृत्व मेहमुददुल्लाकडे सोपविण्यात आले आहे. दरम्यान, लिटॉन दास, सौम्या सरकार आणि रूबेल हुसेन यांना वगळण्यात आले असून मुश्फिकूर रहीमला विश्रांती देण्यात आली आहे. नझमूल हुसेन, अनिमूल इस्लाम यांचे संघात पुनरागमन झाले असून सैफ हसन, यासीर अली चौधरी, एस. इस्लाम आणि यष्टीरक्षक अकबर अली हे नवे चेहरे आहेत.
बांगलादेश संघ- मेहमुदुल्लाह (कर्णधार), नईम शेख, नझमूल हुसेन, अतिफ हुसेन, नुरूल हसन, शेख मेहदी हसन, अमिनूल इस्लाम, मुस्तफिजूर रेहमान, एस. इस्लाम, तस्किन अहमद, शमीम हुसेन, नसूम अहमद, सैफ हसन, यासीर अली, चौधरी, एस. इस्लाम, अकबर अली.