प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे माजी कला व शिक्षण सचिव तसेच प्रतापसिंह राणे मुख्यमंत्रीपदी असतानाचे विशेष अधिकारी शक्ती सिन्हा यांचे नवी दिल्लीत निधन झाले. केंद्रात वाजपेयी यांचे सरकार असताना ते पंतप्रधानांचे संयुक्त सचिव म्हणूनही काम पाहत होते. मृदू स्वभावाचे शक्ती सिन्हा हे गोव्यात त्याकाळात सुप्रसिद्ध होते.