अवजड वाहने, रस्ता अरुंद असल्याने वारंवार वाहतूक कोंडी
बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. शनिवारी सायंकाळी कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे जाणाऱया रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. एकाचवेळी वाहनांची गर्दी झाल्यामुळे त्यातच अवजड वाहने आल्याने केंडीत भर पडली. या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.
शनिमंदिर कॉर्नर, पाटील गल्ली येथे रस्ता अरुंद असल्याने सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. शनिवारी सायंकाळी शनिमंदिर येथे वाहतूक केंडी झाल्यामुळे एका बाजूला हेमू कलानी चौक तर दुसऱया बाजूला पाटील गल्लीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही बेशिस्त पद्धतीने वाहने चालविणाऱया वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. वाहतूक कोंडी रहदारी पोलिसांसाठीही डोकेदुखीची ठरत आहे.