प्रतिनिधी/ बेळगाव
पाटील गल्ली येथील शनिमंदिर परिसरात शनिवारी वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शनिवार असल्याने शनिमंदिर येथे भाविकांची झालेली गर्दी, त्यातच शिवाजी उद्यान येथून पोलिसांच्या वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहतूक कोंडीत वाढ झाली. त्यामुळे रस्त्याच्या तिन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शनिवारी सकाळपासूनच शनिमंदिर परिसर तसेच कपिलेश्वर उड्डाणपूल या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारी आठवडा बाजार असल्याने बाजारातही नागरिकांची गर्दी होती. त्यातच शिवाजी उद्यान येथे युवक जमू लागल्याने शनिमंदिर येथे वाहनांची कोंडी वाढली. शहापूरमधून शहराच्या दिशेने येणाऱया नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागले.