अद्याप 29 हजार जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये
बेळगाव
शनिवारी दिवसभरात बेळगाव शहर व जिह्यातील आणखी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 742 वर पोहोचली असून 26 हजार 330 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
यामध्ये बेळगाव येथील तिघा जणांचा समावेश आहे. सुभाषनगर, शहापूर, भाग्यनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून शनिवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 9 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. अद्याप 70 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
2 हजार 629 हून अधिक जणांचे अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत जिह्यातील 4 लाख 88 हजार 879 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 56 हजार 820 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर कोरोनामुळे 342 जण दगावले आहेत.