प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. शनिवारी 30 नवे रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णसंख्येने 132 चा आकडा गाठला आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अथणी तालुक्मयात 2, बेळगाव तालुक्मयात 8, बैलहोंगल तालुक्मयात 10, गोकाक तालुक्मयात 4, रामदुर्ग तालुक्मयात 3, रायबाग व सौंदत्ती तालुक्मयात प्रत्येकी 1 अशा 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खानापूर व चिकोडी तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 384 वर पोहोचली आहे. यापैकी 99 हजार 248 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 20 लाख 94 हजार 844 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 19 लाख 87 हजार 737 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 1342 जणांचे अहवाल यायचे आहेत.